:: Home ::

:: Profile ::

:: Tours ::

:: Major Distances ::

:: Contact Us ::
 


काश्मीर यात्रा (१० दिवस)

 Shalimar Gardens
 Gulmarg
 

more pictures below Tour Itinerary...


दिवस ०१: मुंबई-जम्मू तावी :

सकाळी बांद्रा टर्मिनस येथे जमावयाचे आहे. सकाळी .५५ वाजता स्वराज एक्स्प्रेसने जम्मू प्रयाण. (गाडी क्र.१२४७१) (दिवस-रात्र ट्रेनमध्ये)

दिवस ०२: जम्मू- तावी :
सकाळी जम्मू येथे आगमन. जम्मू - कटरा बस प्रवास. (सर्व प्रवाश्यांनी ट्रेनमध्ये सामान चढवताना किंवा उतरवताना सामानाची काळजी स्वतः घ्यायची आहे.) कटरा येथे  प्रस्थान आणि मुक्काम संध्याकाळी हॉटेलमध्ये विश्रांतीसाठी वेळ दिला जाईल.

दिवस ०३: माता वैष्णोदेवी- भैरवनाथ मंदिर-अध कुवारी गुफा:
आज आपण बाणगंगा येथे जाणार आहोत तिथे जाण्यासाठी हॉटेलकडून कर पुरवली जाईल. माता वैष्णोदेवी, भैरवनाथ मंदिर आणि अध कुवारी गुफा येथे दर्शनासाठी प्रस्थान.(दर्शन घेण्यासाठी घोडा किंवा डोलीचा खर्च स्वतः करावा.) संध्याकाळी हॉटेलमध्ये.

दिवस ०४:कटरा - श्रीनगर :
सकाळी
श्रीनगरला प्रस्थान. जाताना  रस्त्यात कुड, पटणीटोप, बटोट, बेनिहाल पास आणि काझीगुंड इत्यादी गावे लागतील. दुपारचे जेवण ढाब्यामध्ये दिले जाईल. श्रीनगरला पोहोचल्यानंतर रात्री हॉटेलमध्ये चेक-इन केले जाईल.

दिवस ०५: श्रीनगर-पहेलगाम-श्रीनगर(१८६कि मी):
आज आपण काश्मीरमधील प्रसिद्ध ठिकाण पहेलगाम येथे जाणार आहोत. जे "वेली ऑफ शेफर्ड" या नावाने ओळखले जाते. जाताना रस्त्यात आपण केशराचे मळे, अवंतीपूर आणि अनंतनाग सुलपूर या स्थळांना भेट देण्यात येईल. पहेलगामला आल्यानंतर आपण शहरात फेरफटका मारू आणि बर्फाच्छादित पर्वतांचे फोटोज काढून "लीडर नदीला" भेट देऊ. संध्याकाळी आपण पुन्हा श्रीनगरला पोहोचू.

दिवस ०६: श्रीनगर- गुलमर्ग- श्रीनगर (११२ कि मी):
आज आपण गुलमर्गला प्रस्थान करणार आहोत. जे ठिकाण "मिडोज ऑफ फ्लॉवर्स'' या नावाने ओळखले जाते. गुलमर्ग हे तेथील गोल्फ ग्राउंडसाठी सुद्धा प्रसिद्ध आहे.गुलमर्गला पोहोचल्यानंतर आपण प्रसिद्ध "गोंडोला राईड" करणार आहोत. (स्वखर्चाने). हि राईड गुलमर्ग ते खिलनमर्ग पर्यंत असेल. या राईडच्या प्रवासादरम्यान आपण तेथील बर्फाच्छादित पर्वत तसेच तेथील निसर्गसौंदर्य पाहणार आहोत. पुन्हा श्रीनगरला पोहोचल्यानंतर संध्याकाळचा मोकळा वेळ प्रवाशांसाठी असेल.

दिवस ०७:श्रीनगर- शंकराचार्य मंदिर- मुघल गार्डन-कारपेट फेक्ट्री- खरेदीसाठी वेळ- शिकारा राईड :
आज आपण शंकराचार्य मंदिरात दर्शन झाल्यानंतर दाल लेकला भेट देणार आहोत. त्यानंतर आपण मुघल गार्डन, निशांत बाग,शालीमार बाग यांना भेट देऊन तिथे फोटोज काढू.त्यानंतर दुपारी कारपेट फेक्ट्रीला भेट देऊन बोउलवर्ड रोड आणि लाल चौक येथे खरेदीसाठी वेळ दिला जाईल. संध्याकाळी आपण दाल लेकमध्ये शिकारा राईडसाठी जाणार आहोत. या राईडमध्ये आपण श्रीनगर शहराचा परिसर, फ्लोटिंग गार्डन, हाउसबोट आणि प्रसिद्ध चार चिनार पाहणार आहोत.

दिवस ०८:श्रीनगर- जम्मू:
आज आपण जम्मूकडे प्रस्थान करू. रात्री जम्मूमध्ये वास्तव्य.

दिवस ०९: जम्मू-मुंबई:
 
सकाळी जम्मू येथून मुंबईला रवाना.

दिवस१०: मुंबई:
संध्याकाळी मुंबईत परत.


सहलीचा खर्च: २०,०००/- प्रती व्यक्ती.


सहलीत समाविष्ट असणाऱ्या बाबी:

 • मुंबई-जम्मू-मुंबई II nd class रेल्वे तिकीट.

 • नाश्ता आणि रात्रीचे जेवण (हॉटेलमध्ये आणि हाउसबोट मध्ये)

 • रात्री कटरा येथे मुक्काम (हॉटेल काश्मीर रेसिडेन्सी)

 • रात्री श्रीनगरमध्ये मुक्काम (सुपर डिलक्स हाउसबोट किंवा हॉटेल)

सहलीत समाविष्ट असणाऱ्या बाबी:

 • रेल्वे स्टेशनवर सामान चढवण्याचा आणि उतरवण्याचा खर्च

 • घोडा आणि डोलीचा खर्च.

DEPARTURE DATES: 2022

 

January: 1,2,3,4,7,8,10,11,14,15,16,17,18,21,22,23,24,25,28,29,30,31.
February: 1,4,5,6,7,8,11,12,13,14,15,18,19,20,22,25,26,27,28,29.
March: 3,4,5,6,7,10,11,12,13,14,17,18,19,20,21,24,25,26,27,28,31.
April: 1,2,3,4,7,8,9,10,11,14,15,16,17,18,21,22,23,24,25,28,29,31.
May: 1,2,5,6,7,8,9,12,13,14,15,16,19,20,21,22,23,26,27,28,29,30.
June: 2,3,4,5,6,9,10,11,12,13,16,17,18,19,20,23,24,25,26,27,30
July:
1,2,3,4,7,8,9,10,11,14,15,16,17,18,21,22,23,24,25,28,29,30,31
August: 1,2,3,6,7,8,9,10,13,14,15,16,17,20,21,22,23,24,27,28,29,30,31
September: 3,4,5,13,14,17,18,19,20,21,24,25,26,27,28
October: 1,2,3,4,5,8,9,10,11,12,15,16,17,18,19,22,23,24,25,26,29,30,31
November: 1,2,5,6,7,8,9,12,13,14,15,16,19,20,21,22,23,26,27,28,29,30
December: 3,4,5,6,7,10,11,12,13,14,17,18,19,20,21,24,25,26,27,28,31

सूचना: संप,बंद, पाऊस काही कारणास्तव आपत्ती आल्यास त्या दिवसाचा कार्यक्रम रद्द करण्यात येईल. नैसर्गिक आपत्ती किंवा पघात यासारखे अपघात घडल्यास संयोजक त्यास जबाबदार राहणार नाही.
 

Cheque(s) to be made in favour of:

 • Bank: SBI
  Account Name: "Jai Mata Di Holidays"
  Current Account Number: 31774766122
  IFSC Code: SBIN0005352

 Shikaras on Dal Lake
 House Boats on Dal Lake
 

 Lider ValleyLider River
 

 Banganga
 Patnitop
 

 Shalimar Baugh
 Nishant Baugh
 

 View of Sonmarg
 


Thajwas Glacier as seen from Sonamarg
 

Back to Tours